शारदा ज्ञानपीठम् प्रतिष्ठानच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सक्रीय पाठिंबा व आशीर्वादाने खालील उपक्रम पुढे चालू ठेऊ इच्छितो

१. अमृतवाणी संस्कृत भाषा अध्ययन – सुलभ / व्यावहारिक संस्कृत संभाषण वर्ग. (on line व off line )

२. शिशु- गुंजनम् – रामरक्षा , अथर्वशीर्ष , आद्य शंकराचार्य स्तोत्रे व श्रीमद्भगवद्गीता , विविध स्तोत्रे , सूक्त , इत्यादी शिकवणे. (On line and off line)

३. ⁠वार्षिक शिशु- संस्कार वर्ग

४. वार्षिक ऋषि पंचमी या उपक्रमाद्वारे ज्ञानवृध्द , तपोवृध्द व सेवाव्रती महानुभवांचा गौरव करणे.

५. पंडितजींवरील आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशन – ( त्यांच्या प्रथम वर्ष पुण्यस्मरण दिनी)

६. पंडितजी स्मरणार्थ – दरवर्षी स्मृति व्याख्यान

७. ⁠पंडितजी – स्मृतिग्रंथ प्रकाशन. (पंडितजींच्या द्वितीय वर्ष पुण्यस्मरण दिनी)

८. पुण्याची पुण्याई – पुण्यपत्तन घडवणार्या किमान ५१ व्यक्तींचा इतिहास. ( पंडितजींच्या तृतीय वर्ष पुण्यस्मरण दिनापूर्वी)

९. शारदा गौरव ग्रंथमाला – पुनरुज्जीवन व संगणकीकरण ( प्रकल्प सुरु झाला )

१०. वेद-छात्र , अबला , ज्येष्ठ नागरिक – संरक्षण व आधार

११. ⁠षोडश संस्कार मार्गदर्शन

१२. पंचमहाभूत संरक्षण- संवर्धन.

१३. मूल्य व नैतिकता प्रचार , राष्ट्रीय चारित्र्य निर्माण

१४. शारदा ज्ञानपीठम् वास्तू -उभारणी.

१५. संस्कृत , संस्कृती व संस्कार यासाठी शक्य ते सर्व करणे.

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र - उपक्रम

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र - श्री श्रीवर्धन गाडगीळ यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग

प. पू. सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांच्या कृपाशीर्वादाने, श्रीपाद सेवा मंडळ व शारदा ज्ञानपीठम् यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पठणाचे वर्ग आयोजित केले. पठणाच्या सरावासाठी सोपे जावे म्हणून श्री श्रीवर्धन गाडगीळ यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग सर्व साधक-विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर, प. पू. सद्गुरू श्री दादांनी प्रकाशित केलेल्या ”श्रीविष्णुसहस्त्रनाम रहस्य” या ग्रंथातील शुद्ध केलेल्या पाठाप्रमाणे श्लोक समाविष्ट केले आहेत.

(असे असंख्य व्हिडियो पाहण्यासाठी कृपया ” चॅनेल सब्स्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी 🔔 चिन्हावर क्लिक करा ) कृपया ही मौलिक माहिती अधिकाधिक भाविकभक्तांपर्यंत पोहोचवून आपणही सप्रेम श्रीहरिसेवा साधून घ्यावी ही मन:पूर्वक प्रार्थना !( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य – लेखक – प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. संपर्कक्रमांक – 9322683824 )

Scroll to Top