
भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू झालेला आहे, तसेच पंडितजींच्या या अतुलनीय सौष्ठवपूर्ण संस्थाउभारणी कार्याचा अमृतमहोत्सवदेखील समीप येतो आहे (सन २०२५), पंडितजींनी ‘विश्व विपन्मोक्ष (संकटमोचन) -अभियान-यज्ञ’ करण्याचा संकल्प सोडला. त्याची विस्तृत माहिती सोबत दिली आहे.
संस्कृत – संस्कृति – संस्कार यांप्रत गेली ७२ वर्षे अहर्निश झटणाऱ्या या संस्थेचे तीन दिमाखदार प्रकल्प –
बहुविधक्षेत्रांतील सर्व जातिधर्माच्या आदर्श ऋषितुल्य सांप्रतिकांचे, तपस्वी-श्रेष्ठांचे प्रकटपूजन (सलग ४६ वर्षे)
शिशु प्रौढ ज्येष्ठ नागरिक सैनिक आपद्ग्रस्त महिला – दिव्यांग तसेच कारागृहातील बंदी, अशा एक लक्ष नागरिकांद्वारा ‘वंदे मातरम्’ तसेच ‘रामरक्षा-सुरक्षा-कवच’ यांचे पठण
संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांची ९२ वर्षांची प्रेरणादायी संघर्षगाथा प्रकाशन (संस्कृत-मराठी-इंग्रजी तसेच अनेक अन्य वैश्विक भाषांमधून)
अंदाजे १०१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या अभियान-यज्ञाचा संकल्प व कार्य सिद्धीस नेण्यासाठी आपणांसारख्यांची समर्थ साथ लाभेलच !
‘विश्व-विपन्मोक्ष अभियानयज्ञा’ मध्ये यथोचित समिधांचे योगदान देण्याची आपणांसारख्या समाज-धुरीणांना अभूतपूर्व सुवर्णसंधी आहे. (80G सुविधा लागू) याद्वारे वैश्विक कल्याण साध्य करता येईल, हे सुनिश्चित !
आपल्या समिधेचे स्वरूप सुनिश्चित करण्याप्रीत्यर्थ प्रत्यक्ष दर्शन-भेट-संवादासाठी आपल्या सोयीची योग्य वेळ कळविल्यास उत्तम…
संस्कृत
सर्व भाषांची आदिजननी देवभाषा संस्कृत प्रसारहेतु ग्रंथालय-वाचनालयाद्वारा संस्कृत वाङ्मय-संकलन-जतन-प्रकाशन, डिजिटायझेशन तसेच ई-प्लॅटफॉर्म उभारणे
अमृतवाणी संस्कृत भाषेचे शिक्षण, शिशु ते वृद्धांसाठी दैनंदिन व्यावहारिक (प्रॅक्टिकल) संस्कृत संभाषण वर्ग तसेच विद्यापीठांमधून संस्कृत शिष्यवृत्ती, संशोधन व अध्यासन निर्मिती
संस्कृति
विश्वभारत-दर्शन: भारतवर्षातील पुरातन १४ विद्या व ६४ कला यांची पारंपरिक सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरी येथे समस्त संघराज्यांचा पुढाकार व योगदान मिळवून आपापल्या प्रांताचा भौगोलिक तथा सांस्कृतिक दर्शन-परिचय होईल अशी दालने असलेले कायमस्वरूपी विश्व-संस्कृतिभवन उभारणे
‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्वोक्तीनुसार विश्वभरातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान घडवून आणणाऱ्या स्वतंत्र केंद्रांची उभारणी
भारतीय संस्कृतिमागील शास्त्रीय दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार हेतु विदेशामधून भारतोत्सवांचे आयोजन
संस्कृतिरक्षक अन् सामयिक उद्दिष्टांप्रत झटणाऱ्या समस्त सरकारी, निमसरकारी, खासगी तसेच आंतरराष्ट्रीय मान्यवर संस्था, ट्रस्ट्स्, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, छात्रसंघ सोबत सहयोगाने मार्गक्रमण
योग-आयुर्वेद आदि पारंपरिक चिकित्सापद्धर्तीचे रक्षण-पुनरुत्थान, निरामय जीवनशैली-वृद्धीप्रत वैद्यकीय व्यवस्था उभारणे आणि आर्य संस्कृतीतील षोडश-संस्कारांचा परिचय, प्रचार व प्रसार
