
संस्कृतात्मा पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या कार्याला वाहिलेले संकेत स्थळ
पंडितजींविषयी ,
दि. : ११ मे १९५१ स्थळ : १२ ज्योतिर्लिंगांपैकी अग्रणी, १७ वेळा गजनी महमूद याने ध्वस्त केलेले सोमनाथ मंदिर, गुजरात
निमित्त : सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा सोहोळा
उपस्थित श्रेष्ठी : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेन्द्रप्रसाद, प्रधानाचार्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मंदिराचे तीन विश्वस्त कन्हैय्यालाल मुन्शी, काकासाहेब गाडगीळ व जामसाहेब ऑफ नवानगर
मे महिन्यातील त्या सुमंगल घटिकेला या दिग्गज धुरीणांमध्ये कोल्हापुरात जन्मलेला २१ वर्षांचा पोरसवदा तरूण उपस्थित होता वसन्त अनन्त गाडगीळ ! वडिलांकडेच त्याचे वेदाध्ययन पार पडले होते.”स्थिरो भव.. शाश्वतो भव..” या पवित्रमंत्राने सकाळी ठीक अकरा वाजता ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्याक्षणी पंडितजींनी डॉक्टर राजेन्द्रप्रसाद यांच्या समोर ज्योतिर्लिंगावर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली
“आ उत्तम श्वासम् = उत्तम-श्वासम् संस्कृतम्।।”


सविनय नमो नमः।
संस्कृतात्मा पंडित वसंतराव गाडगीळ
यांनी दि. १८/१०/२०२४ रोजी संस्कृतची अविरत सेवा करत करत
देह सोडला.
त्यांची अपूर्ण राहिलेली संस्कृत- संस्कृती – संस्कार संवर्धन सेवा पुढे अविरत करीत राहण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.
शारदा ज्ञानपीठम् प्रतिष्ठानच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सक्रीय पाठिंबा व आशीर्वादाने खालील उपक्रम पुढे चालू ठेऊ इच्छितो